१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षा आदी उपाययोजनांची दखल
मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वाेत्कृष्ट कृषी राज्य [ AGRO STATE AWARD ] पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे.
नवी दिल्लीत १० जुलै रोजी आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे [ CM EKNATH SHINDE ] हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बांबू लागवड, तृणधान्य- श्रीअन्न अभियान आणि औष्णिक वीज निमिर्तीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे श्री. पटेल यांनी नमूद केले आहे.
सदर पुरस्कार १० जुलै रोजी १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्याचे मंत्रिगण आदी सहभागी होणार आहेत.
युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले आहे. आता होरपळीचे युग सुरू झाले आहे. आता तातडीच्या प्रयत्नांंची गरज आहे, अशी जगातील सर्व देशांना हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देणारे आणि त्यावर गांभीर्याने पावले उचलणारे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिले नेतृत्व आहे. गुट्रेस यांनी दगडी कोळसा जाळणे थांबवा आणि वृक्षारोपणाची गती वाढवा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आता २१ लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दगडी कोळसा जाळणे कमी व्हावे, यासाठी कोळशाऐवजी ५ टक्के बायोमास वापरण्याचा निर्देश देणारे श्री. शिंदे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.
TAPORI TURAKI कंडक्टर नागपुरातील होता ना..
CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून अभिनय
गुट्रेस यांचा मानव जात वाचवण्याच्या हाकेला संवेदनशीलतेने प्रतिसाद देणाºया त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मुख्यमंत्री शिंदे यांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. जगात नव्हे, किमान देशात तरी अशी क्रांतिकारी पावले उचलणारे खरोखरच आपल्या मुख्यमंत्री पदासोबतच पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे निर्णय घेणारे श्री. शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
हा पुरस्कार २०२३ मध्ये तामिळनाडू, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशला मिळाला होता. समितीचे विद्यमान अध्यक्ष न्या. सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे. आतापर्यंत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अखिलेश यादव, स्व. प्रकाशसिंग बादल, स्व. वर्गीस कुरियन, स्व. एम.एस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. अॅग्रीकल्चर टुडेच्या वतीने पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. स्व. स्वामीनाथन यांनी १० वर्षे संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान संस्थेचे अध्यक्ष आहेत.