AIIMS NAGPUR : AIIMS NAGPUR आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रितपणे आदिवासी आरोग्य संशोधनाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे आदिवासी समाजातील आरोग्यविषयक समस्या, त्यांचे निराकरण, तसेच संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य व नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. [ AIIMS NAGPUR -NASHIK HEALTH UNIVERSITY ]
कराराच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आरोग्याशी संबंधित प्रमुख आव्हाने ओळखून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. दोन्ही संस्थांच्या तज्ञांचा सहभाग या संशोधनाच्या उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
TAPORI TURAKI तुफानी बारिश में आधी रात को देवा पिझ्झा लेने गया…
एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी [ DR PRASHANT JOSHI AIIMS ] आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर [ MADHURI KANITKAR ] या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
LOKBIMB PHOTO STUDIO पोलिस पाटील संघाचे आठवे राज्यस्तरीय अधिवेशन …