नागपूर : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत [ ANNAPURNA YOJANA ] पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेकरीता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने लाभार्थी महिलांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.
अशी करा ई-केवायसी
ई-केवायसी कोणालाही त्यांचे खाते असलेल्या गॅस एजन्सीमध्ये करता येईल. किंवा एच. पी. पे.या अॅपवरुन सेल्फ ई-केवायसी करता येते. ई-केवायसी ही एक साधी १ मिनिटाची प्रक्रिया आहे. ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनव्दारे ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे. कोणत्याही कंपनीच्या ग्राहकांनी गॅस रिफीलींग करीता ऑनलाईन बुकींग करावी.
BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे
तसेच, ३ गॅस सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसुल करण्यात येईल. त्याकरीता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर ३ गॅस सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरुपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरीता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरूषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही.
LOKBIMB PHOTO STUDIO : सीमेंट फलकावर थुंकल्याचे …
नागपुर शहर पुरवठा विभागातील HPCL च्या एकुण २६ एजन्सी, BIPCL च्या एकुण ११ एजन्सीज IOCL च्या एकुण १४ एजन्सी अशा एकूण ५१ गॅस एजन्सी कार्यरत आहे. ई-केवायसी प्रक्रिया पुर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास नागपुर शहर पुरवठा विभाग या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांनी केले आहे.