नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी कायम असून, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. अकोलातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळाली आहे़ वर्धा येथून रामदास तडस कायम आहेत़
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाराष्ट्रातील २० लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भातील चार मतदारसंघांचा समावेश आहे़ नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा संधी मिळाली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जोरदार आनंद व्यक्त केला़
दुसरीकडे शिंदे सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही लोकसभा मैदानात उतरविले आहे़
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपाचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता राज्याच्या राजकारणाात होती़ अखेर बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर, काही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी कायम असून, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. अकोलातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळाली आहे़ वर्धा येथून रामदास तडस कायम आहेत़
मात्र, मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली़ यात उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातून विद्यमान खासदारांना नाकारण्यात आले असून, उत्तर मुंबईत पीयूष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली.
महाराष्ट्रातील उमेदवार
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड -पंकजा मुंडे (प्रीतम मुंडे बदल)
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पीयूष गोयल (गोपाळ शेट्टी बदल)
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा (मनोज कोटक बदल)
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ (उन्मेष पाटील बदल)
१५) दिंडोरी- भारत पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे (संजय धोत्रे बदल)
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित