NAGPUR RAILWAY STATION : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज [ September 16, 2024 ] व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर रेल्वे स्थानकावरून नागपूर -सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन नागपूरवरून सेवाग्राम ,चंद्रपूर, बल्लारशा, रामगुंडम, काझीपेठ असा प्रवास करून सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे. या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कमी वेळात […]
प्रादेशिक
नागपूर : महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ फिजिओथेरपी केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवा माफक दारात उपलब्ध करण्यात येईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह ,सदर रोग निदान केंद्र आणि महाल रोग निदान […]
MSRTC BUS : मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी नऊ वर्षांनी प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रुतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून, महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख […]
YOJANADOOT : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या […]
ATUL LONDHE ON AANANDACHA SHIDHA : महायुतीचा हा कसला आनंदाचा शिधा, हा तर त्यांच्यासाठी मलिदाच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारला थेट आरसाच दाखविला आहे. अतुल लोंढे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत आनंदाच्या शिध्यातील साखर, डाळ, तेल निकृष्ट असल्याचे सिद्ध केले़ सणासुदीसाठी सरकारने जाहीर केलेला आनंदाचा […]
ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हिल्स (FSW) युनिट्स तैनात करावेत, असे प्राधिकरणाचे निर्देश आहेत. या युनिट्समुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळू शकेल. FSSAI ORDER : उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना […]
AJIT PAWAR IN EVM : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. विधानसभा निवडणुकीचा […]
NAGPUR AUDI ACCIDENT : फक्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अडकवण्यासाठीच कार अपघातासंदर्भात राजकारण करणे योग्य नाही, असे मत उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या असलेल्या कारमुळे सोमवारी मध्यरात्री नागपुरात काही वाहनांना अपघात घडला, याबाबत पोलिस […]
आपले सर्वस्व शासनाकडे सोपविल्यानंतरही या प्रकल्पग्रस्तांच्या हातात आणि मनात फक्त आणि फक्त निराशांचा ‘महापूर’ ओसंडून वाहत आहे. BEMBALA IRRIGATION PROJECT BABHULGAON : यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगांव तालुक्यात खडकसावंगा शिवारात बेंबळा नदीला अडवून तिच्यावर धरणाची निर्मिती करण्यात आली़ मात्र, घरदार आणि शेतजमिनीच्या बदल्यात शासकीय नोकरीची तरतूद असतानाही नोंदणीकृत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांना शासकीय नोकरीपासून […]
GANESHOTSAV 2024 : विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झाले. घरोघरी गणरायाच्या आगमन, नागपुरात ढगांच्या गडगडाटात दमदार पावसाला [ HEAVY RAIN IN NAGPUR ] सुरुवात झाली आहे. TAPORI TURAKI नितीन लाडानं बायको नीलिमाला म्हणाला … नागपूरवासीयांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेश […]