नागपूर : अजनी रेल्वे परिसरात नवीन पार्किंग आणि विविध प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाºया विविध प्रजातीच्या झाडांची मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी,अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी रेल भूमी विकास प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि स्वच्छ असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. विकासकामात अडथळा निर्माण करणाºया हेरिटेज वृक्षांना कापण्याऐवजी त्यांचे संरक्षण करण्याचे […]
फोटो स्टुडिओ
MINI TRUCK COLLAPSE IN NALAAH : साकोली तालुक्यातील खांबा / जांभळी येथे भजन मंडळी यांना घेऊन जाणारा मिनी ट्रक वाहन पुलावरून नाल्यात कोसळला़ या अपघातात १३ इसम किरकोळ जखमी झाले. दुर्दैवाने दोन लहान मुली पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांसह तहसीलदार आणि नायब तहसीलदार उपस्थित आहेत. […]
BHANDARA TRUCK ACCIDENT : भंडारा जिल्ह्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मुजाबी गावाजवळ दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रकचा चेंदामेंदा झाला असून, ट्रकचालक आपल्या वाहनात अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
SVACHHATA BRAND AMBESADOR : स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना घराघरापर्यंत पोहोचावी या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या [ NAGPUR MAHANAGAR PALIKA ] वतीने शालेय विद्यार्थीना मनपाचे स्वच्छता योद्धा अर्थात स्वच्छता ब्रँड अँम्बेसेडर बनविण्यात आले. लालबहादूर शास्त्री मनपा शाळेचा विद्यार्थी प्रीतमकुमार राम, कपिल नगर हिंदी हायस्कूलची सबा अन्सारी, नेताजी मार्केट हिंदी […]
LOKBIMB PHOTO STUDIO : “स्वच्छता ही सेवा २०२४” अभियानातील भव्य रांगोळी मेकिंग उपक्रमा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ याचे महत्व विशद करणारी आकर्षक बोलकी सुबक आणि “२६ बाय २०” फूट आकाराची भव्य रांगोळी मनपा मुख्यालयातील दालनात साकारण्यात आली. ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ चे महत्व सांगणारी आणि स्वच्छता ही सेवा संकल्पनेची माहिती देणारी बोलकी सुबक […]
NAGPURCHA DABEWALA : मुंबईतील जेवणाचे डबेवाले जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत़ नागपुरात अनेकजण व्यावसायिक, प्रतिष्ठाने आणि कार्यालयातही जेवणाचे डबे पुरवितात. चंदन लालचंद तोलानी हे वर्षभर मंगळवारी बाजार, सदर भागात डबे पोहोचवित असतात.
LOKBIMB PHOTO STUDIO: दक्षिण नागपूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते प्रमोद मानमोडे [ PRAMOD MANMODE ] , दीपक कापसे, मंगला गवरे, अपूर्वा पिट्टलवार, राजू वाघमारे, दीपक पोहनकर आदी उपस्थित होते. दक्षिण नागपूर उपजिल्हा प्रमुख मुकेश रेवतकर यांनी यशस्विरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
नागपूर : आक्रमण युवक संघटना आणि पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॅटिक [ PARTY OF INDIA DEMOCRATIC ] यांच्या संयुक्त विद्यमाने 6 सप्टेंबर रोजी संविधान चौक येथे देशात महिलांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. एका संयुक्त शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
नागपूर : कृत्रिम अवयव, ई-रिक्षा, उपचारासाठी वैद्यकीय मदत यासह विविध मागण्यांची निवेदने स्वीकारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी [ Nitin Gadkari ] यांनी दिव्यांगांना आधार दिला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात त्यांनी विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारली.
PHOTO STUDIO : नागपुरातील रेशीमबाग येथे शनिवारी [ 31st August 2024 ] मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले़. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण राखी अशी उंचावून दाखविली.