लातूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.