नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही राहणार सहभाग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा केली आहे. नियमांनुसार ही यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. पुढील दिवसांत हे ४० जण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे रान उठवणार आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यात अन्य राज्यातील वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदींचा समावेश आहे़ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
MOHAN MATE विद्यमान आमदार मोहन मतेंनी दाखल केला नामांकन अर्ज
किशोर कन्हेरे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त,माळी समाजाचा सन्मान
काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथाला यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे. अशोक गहलोत, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, सिद्धारमय्या, भूपेश बघेल, रेवंत रेड्डी, चरणजीत सिंह चन्नी, डी. के. शिवकुमार, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, जी. परमेश्वरा, एम.पी. पाटील, कन्हैया कुमार, इमरान प्रतापगढी, अलका लांबा, के. जी. जॉर्ज, के. जयकुमार, जिग्नेश मेवाणी, नदीम जावेद, सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, चंद्र्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, आरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विलास मुत्तेमवार, अशोक जगताप,अमित देशमुख आणि विश्वजीत कदम हे सर्व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होतील.
सर्व स्टार प्रचारक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.