शेतीसंबंधी विविध अडचणी, रस्ते विकास, पाणी पुरवठा, उद्योगांची वाणवा, धरणग्रस्तांच्या अडचणी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी समस्यांनी आकंठ बुडालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतीला आपल्या मतांद्वारे जवळ करतात, हे २३ नोव्हेंबरच्या निकालातून पुढे येणार आहे़
एकूण सात विधानसभा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय राठोड (शिवसेना-शिंदे गट) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे [ MANIKRAO THAKARE ] यांच्यात जोरदार तसेच महत्त्वपूर्ण लढत होणार आहे़ त्यामुळे लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
यवतमाळातील सात विधानसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ हे तीन लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला इथून यश मिळाले होते़ तर, राष्ट्रवादी काँग्रेसला पुसदची जागा मिळाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मविआला संधी दिली़
यवतमाळातील अन्य लढती अशा आहेत…
यवतमाळ मतदारसंघ : अनिल उर्फ बाळासाहेब मांगळुकर (काँग्रेस) विरुद्ध मदन येरावार (भाजपा)
वणी मतदारसंघ : संजय देरकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार (भाजपा)
राळेगाव मतदारसंघ : वसंत पुरके (काँग्रेस) विरुद्ध अशोक उईके (भाजपा)
आर्णी मतदारसंघ : जितेंद्र मोघे (काँग्रेस) विरुद्ध राजू तोडसाम (भाजपा)
उमरखेड मतदारसंघ : साहेबराव कांबळे (काँग्रेस) विरुद्ध किसन वानखेडे (भाजपा)
पुसद मतदारसंघ : शरद मैंद (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) विरुद्ध : इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट), दिग्रस विधानसभा मतदारसंघ : माणिकराव ठाकरे (काँग्रेस) विरुद्ध संजय राठोड (शिवसेना-शिंदे गट)
मविआत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा
महाविकास आघाडीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. यवतमाळमधून बाळासाहेब मांगुळकर, राळेगावमधून वसंत पुरके, आर्णितून जितेंद्र मोघे, उमरखेडमध्ये साहेबराव कांबळे आणि दिग्रसमध्ये माणिकराव ठाकरे लढत आहेत. म्हणजेच पाच जागा काँग्रेसकडून लढवल्या जात आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला वणी विधानसभा मतदारसंघाची जागा देण्यात आली आहे. तिथून संजय देरकर निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुसदची जागा लढवली जात असून,याठिकाणी शरद मेंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीत भाजपा वरचढ
महायुतीत भाजपाकडून तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मदन येरावार, संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार आणि अशोक उईके यांचा समावेश आहे. किसन वानखेडे आणि राजू तोडसाम यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय राठोड [ SANJAY DULICHAND RATHOD ] आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) पुसदमधून इंद्रनील नाईक यांना संधी देण्यात आली आहे.