#14 DEAD IN MUMBAI
GHATKOPAR HORDING : अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रूतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. या घटनेमुळे आतापर्यंत जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अन्य ७५ जण जखमी झाले असून, विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत सोमवारी दुपारी अचानक सुरू झालेला वादळी वारा आणि पावसामुळे अनेकजण सदर पेट्रोल पंपवर थांबले होते़ यावेळी अचानक पंपालगत उभारलेला एक भला मोठा होर्डिंग वादळी वाºयामुळे पंपवर कोसळला. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली वाहने दाबली गेली. यात लोखंडी साहित्यांचा वापर केला असल्याने अनेकांना जखमा झाल्या़ सदर वृत्तलिहिस्तोवर एकूण १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़
READ ALSO :
AMITABH BACHHAN IN DIWAR MOVIE
कडक कारवाई:मुख्यमंत्री
सदर घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांनी चर्चा केली. मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना आयुक्तांना दिले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून, जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे ते म्हणाले़
मनुष्यवधाचा गुन्हा: देवेंद्र फडणवीस
मुंबई पोलिस, महानगरपालिका,आपत्ती व्यवस्थापन यांनी तातडीने बचावकार्य केले़ जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना सर्वप्रकारचे सहाय्य करण्यात येईल. शिवाय सदर घटनेची चौकशी होणार आहे़ दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक असे की, १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग राज्य सरकारच्या जागेत अनधिकृतरित्या लावल्याचे उघड झाले आहे़ त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महानगरपालिका कारवाई करत आहे.