HIT AND RUN आणखी कुठंवर चालणार ‘हिट अँड रन’, कुटुंबाचा कणा क्षणात नाहीसा होतो

Spread the love

HIT AND RUN : पुण्यातील ‘पोर्शे हिट अँड रन’ प्रकरण अख्ख्या देशात गाजत असतानाच पुन्हा मुंबई आणि पुण्यात ‘हिट अँड रन’ घटना घडली आहे. वरळीत एका मस्तवाल मुलाने महिलेला चिरडले, तर पुण्यात समोरून येत असलेल्या कारचालकाने पोलिस कर्मचाºयाचा बळी घेतला. अशाप्रकारच्या समाजविरोधी घटनांतून कुण्या कुटुंबाचा आधार क्षणात नाहीसा होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे समाजात प्रचंड चीड निर्माण होत आहे.


माहितीनुसार,जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले़ यात एका पोलिस कर्मचाºयाचा मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला़ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचे सांगण्यात येते.


समाधान कोळी आणि पी. सी. शिंदे हे दोघे पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात समाधान कोळी यांचा मृत्यू झाला़ तर पी. सी. शिंदे गंभीर जखमी झाले़ अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला.


संतापजनक : महिलेस फरफटत नेले
मुंबईच्या वरळीत एका मस्तवाल मुलाने आपल्या चारचाकीने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला जोरदार धडक दिली आणि महिलेस काही अंतर फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार शनिवारच्या रात्री घडला.
यातील मृत महिला ही ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी असल्याची माहिती समोर आली आहे़


माहितीनुसार, मिहीर शहा याने आपले कार वाहन अनियंत्रित चालवून प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. यात प्रदीप थोडक्यात बचावले असून, कावेरी यांना मात्र मिहीर यांनी फरफटत नेले. घटनेनंतर आरोपी मिहीर फरार असून, पोलिसांनी ११ पथके त्याचा शोध घेत आहे़ दरम्यान, पोलिसांनी अख्खे शहा कुटुंबावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ कारण या सर्वांनी आरोपीचा बचाव केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे़ यात आरोपीच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

इतर मागास प्रवर्गाची वार्षिक उत्पन्न मर्यादा वार्षिक 15 लाख करण्याचे प्रयत्न

Wed Jul 10 , 2024
Spread the love MONSOON SESSION 2024 : इतर मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती अथवा गट वगळून आरक्षणाचे लाभ मिळविण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. ही उत्पन्न मर्यादा केंद्र सरकारच्या कार्मिक, नागरिकांच्या तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागामार्फत निश्चित करण्यात येते. ही उत्पन्न मर्यादा (नॉन क्रिमिलेअर) […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links