महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील एक मोठा चेहरा किशोर कन्हेरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.
KISHOR KANHERE l October 20, 2024
विदर्भाचे ‘बाहुबली’ अशी ओळख असलेले किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस अध्यक्ष [ NATIONAL CONGRESS PRESIDENT ] मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार, खासदार वर्षा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी किशोर कन्हेरे यांचे पक्षात स्वागत केले. तसेच, माळी समाजाला निश्चित न्याय देण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले.
TAPORI TURAKI बस लंबाई पैरों तक कर देना…
शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्षासोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना किशोर कन्हेरे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
TAPORI TURAKI पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…
किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात निश्चित खूप फायदा होईल. माळी समाजाला त्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे न्याय देण्यात येईल, असा आशावाद दर्शवत महाराष्ट्रातील नेत्यांनी किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला आहे.
मोठे योगदान
उल्लेखनिय असे की, महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचे विदर्भात जवळपास 25 लाख मतदान असले तरी या समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले. छगन भुजबळ वगळता एकाही नेत्याला माळी समाजातून राजकारणात स्वीकारण्यात आले नाही. छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्व-केंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिल्याची टीका अनेकदा करण्यात येते.
राजकारणातील बातम्या :
निकालाआधीच मतेंनी उधळला गुलाल, समर्थक म्हणतात दक्षिणेवर स्वारी आमचीच
सुधाकर कोहळे म्हणतात, मी मागील दाराने नाहीच…आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक