CM EKNATH SHINDE ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही नेहमी सुरू रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे़ ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
NAGPUR PINK CITY नागपूर शहर होणार ‘गुलाबी गुलाबी’
गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाºया रकमेतून काही महिलांनी लहान लहान व्यवसाय सुरू केले असून, त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वत:च्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
HINGANA VIDHANSABHA राष्ट्रवादीतर्फे बोढारे की काँग्रेसकडून राऊत
पंतप्रधान मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून, ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.