नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करत संपूर्ण शहरात मतदानाचा जागर केला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात ही मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलींमध्ये १० हजारांवर महिलांनी सहभाग नोंदवून मतदानासाठी नागरिकांना जागरूक केले.