निश्चितच यातून राजकारण कात टाकतेयं, असे म्हणता येणार नाही़ कारण होतेयं, ते सोयीसाठी असेही म्हटले जात आहे.
VIDHANSABHA ELECTION 2024 l November 2, 2024
यंदाची विधानसभा निवडणूक अनेक मुद्यांनी गाजत आहे़राज्याच्या राजकारणात नक्कीच हे मुद्दे ‘इतिहास’ बनून राहणार आहे़ उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास घेतलेला प्रचंड असा वेळ आणि आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मित्रपक्षांकडे धाव घेतली आहे़
महाराष्ट्रात सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीचे महत्त्वाचे स्थान आहे़ यंदाच्या विधानसभा उमेदवारी वाटपात कधी नव्हे इतका वेळकाढूपणा दिसून आला़ त्यामुळे आपल्या पक्षात उमेदवारी मिळण्याची लक्षणे न दिसून येताच मित्रपक्षांकडून ती प्राप्त केल्याचे दिसून आले. यात भारतीय जनता पार्टीचे नाव अग्रक्रमावर आहे़ भाजपासोडून शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) दाखल होत निलेश राणे, राजकुमार बडोले, संजय काका पाटील, मुरजी पटेल या कट्टर भाजपा नेत्यांनी विधानसभेसाठी यांनी (मनात कमळ ठेवत) हाती धनुष्यबाण घेतले किंवा हाताला घड्याळ बांधून घेतले.
‘परंपराछेद’
निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षातील निष्ठावान नेता किंवा कार्यकर्त्याला संधी दिली जाते, अशी एक साधारण परंपरा आहे. आता तिला छेद देत मित्रपक्षातील इच्छुकांना आयात करून उमेदवारी देण्याची नवीन परंपरा सुरू झाल्याचे यंदा ठळकपणे दिसून आले आहे़ महायुतीबद्दल बोलायचे झाल्यास तब्बल नऊपेक्षा अधिक जण तात्पुरती व्यवस्था (इन्संट) म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक मैदानात आले आहेत.
‘राणे पॅटर्न’
भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा हातात धनुष्यबाण घेत कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळवली. पालघरमध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी धनुष्यबाण घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली़ भाजपामधून शिवसेनेत दाखल मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली.
अन्य राजकीय बातम्या :
MOHAN MATE विद्यमान आमदार मोहन मतेंनी दाखल केला नामांकन अर्ज
VIDHANSABHA ELECTION 2024 : राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार
WEST NAGPUR VIDHANSABHA CONSTITUENCY भाजपाने दिला चकवा, पश्चिम नागपूर मतदारसंघ सुधाकर कोहळेंना बहाल
DIGRAS VIDHANSABHA CONSTITUENCY दिग्रसमध्ये संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरेंमध्ये जोरदार लढत
बोईसरमधून विलास तरे यांनी भाजपा सोडून धनुष्यबाणावर निवडणूक रिंगणात उडी मारली़ भिवंडी पूर्वमधून संतोष शेट्टी, बार्शीमधून राजेंद्र राऊत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. शिवसेनेप्रमाणेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपामधून आलेल्या तीन जणांना उमेदवारी जाहीर केली़
माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करत तासगाव कवठे महांकाळ येथून उमेदवारी हस्तगत केली़ नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी ‘वेळ’ पाहून ‘घड्याळ ’बांधून घेतले आणि उमेदवारी मिळवली.
विदर्भातही एक उदाहरण पुढे आले आहे़ गोंदिया जिल्ह्यात भाजपा नेते राजकुमार बडोलेंनी अजित पवारांकडे धाव घेत अर्जुनी मोरगावांतून उमेदवारी मिळवली. निश्चितच यातून राजकारण कात टाकतेयं, असे म्हणता येणार नाही़ कारण होतेयं, ते सोयीसाठी, असेही म्हटले जात आहे.