MAHARASHTRA BJP : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पार्टीने १६० जागा लढवाव्या. यापैकी किमान १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवावे, या प्रमुख मुद्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समोर आले आहे़
TAPORI TURAKI मग, केव्हा तरी हा रेशमाचा धागा वरणात येतो …
ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहा यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशीष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
गडकरी आता ‘बदल’ करी, कोणता आणि कसा … वाचा
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागा वाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे.त्यांना ७० हून अधिक जागा देण्यासंबधी निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, अशी अपेक्षा राज्यातील नेत्यांनी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणि जिंकून येण्याची क्षमता पाहूनच त्यांना जागा द्याव्यात, अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या चुका लक्षात घेऊन ही निवडणूक महायुतीमधील पक्षांनी एकत्रितरित्या लढवावी. त्यात भाजपाची बिग ब्रदर अर्थात ‘मोठ्या भावाची’ भूमिका असावी, याचा पुनरुच्चार भाजपाच्या नेत्यांनी अमित शहा [ AMIT SHAHAA ] यांच्यासमोर केला. एकमेकांवर सार्वजनिकरित्या टीका टाळण्याचा सल्ला अमित शहा यांनी राज्यातील लहान मोठ्या नेत्यांना दिल्याचीही म्हटले आहे.