DEVENDRA FADANVEES NOMINATION l October 25, 2024
विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, ज्येष्ठ नेत्या सुलेखा कुंभारे, माजी खासदार विकास महात्मे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर रॅली कार्यालय परिसरात पोहोचली.
सहावी निवडणूक
देवेंद्र फडणवीस दोनवेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून तीनवेळा विजय प्राप्त केला़ सलग पाच वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची यंदाची सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.
गडकरींच्या निवासस्थानी भेट
देवेंद्र फडणवीस यांनी नामांकन दाखल करण्याआधी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी सौ़ कांचन गडकरी यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना ओवाळले.