MANJIREE MOTHER’S KITCHEN : आपल्या मुलांनी चांगलंचुंगलं पौष्टिक खावं, असं प्रत्येक आईला वाटतं. प्रश्न असतो वेळेचा! त्यातही नोकरदार आयांना ही समस्या जरा जास्तच भेडसावत असते,की मुलांना मधल्यावेळेचं खाणं काय करायचं? मुख्य म्हणजे करून ठेवायचं, कारण वेळ हाताशी कमी असतो. थोडी पूर्वतयारी करून ठेवली तर पौष्टिक पदार्थ नक्की करता येतात.मात्र, सुटीच्या दिवशी त्यासाठी काही तयारी, जमवाजमव करून ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणजे डोसा करायचा असेल तर त्याचं पीठ, थालीपिठांची भाजणी हे सारं आधीपासून करून ठेवू शकतो.
एक सोपा उपाय सूचवावासा वाटतो. आईनं घरात एक खाऊचा कप्पा करून ठेवावा. त्या कप्प्यात अशा गोष्टी ठेवाव्यात ,की ज्या मुलांनी खाव्यात. मुुलांना त्या वस्तू दिसत राहल्या तर त्या खाऊन पहाव्याशा वाटतात.
TAPORI TURAKI मैं घर संभालती हूं, किचन संभालती हूं …
खाऊच्या डब्यात कायम बिस्किटं किंवा चिप्सच भरून ठेवले तर मुलं तेच खाणार. त्याऐवजी खारोड्या, गुळदाणे, डाळगूळ, ड्रायफ्रुट्र्स असं काही डब्यात सापडलं तर मुलं ते हळूहळू खाऊन पहायला शकतील. नुसतं हे खा, ते खा असं मुलांना सांगण्यात काही अर्थ नसतो. त्यापेक्षा त्यांची ‘टेस्ट डेव्हलप’ करणं, त्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊन पहायला, पौष्टिक ते नेहमी खायला शिकवणं गरजेचं असतं. त्यामुळे एकट्या मुलालाच हेल्दी खाऊ घालू, त्याचं रुटीन ठरवू,असं करून नाही चालत.
कुटुंबाचा आहार ठरावा
सगळ्या कुटुंबानंच पौष्टिक-चौरस आहार घेणं, व्यायाम करणं गरजेचं असतं. ते पाहून पाहूनच मुलं अनुकरण करतात. हेदेखील मान्य,की आई नोकरी करत असेल तर रोजच्या रोज नवीन काहीतरी करणं अवघड होतं.मग आहाराचा आठवड्याचा पॅटर्न ठरवून घ्यायला हवा. त्यातलं आपण काय करणार याचं आधीच नियोजन आणि पूर्वतयारी करून ठेवली तर मग काही पदार्थ करताना धावपळ होत नाही.
मुख्य म्हणजे असं लक्षात आलंय,की मुलांना पदार्थाची पारंपरिक नावं आवडत नाही. काहींना त्यांचा ‘लूक’ आवडत नाही. त्यामुळे त्या पदार्थाना काही वेगळं नाव देण्याची,त्याचं रंगरूप थोडं बदलण्याची तसदी घेतली तर मुलं ते पदार्थ आवडीनं खातात.
TAPORI TURAKI मैं मेकअप करती या इनके दांत …
मुख्य म्हणजे आईच्या डोक्यात कायम ही प्रक्रिया सुरू असली पाहिजे,की पौष्टिक-वेगळं असं आपल्या मलांना काय करून घालता येईल; पण हे सारं कधी होईल,जेव्हा आई बारकाईनं विचार करील. पौष्टिक-चौरस आहाराचं महत्त्व आईलाही पटेल, तेव्हाच ती हे सारं करू शकेल! ते जमलं तर मुलांना रोज काहीतरी नवीन देणं, त्यांना चौरस आहाराची सवय लावणं, त्यांची ‘टेस्ट डेव्हलप’ करून जे खातोय,त्याचं महत्त्व पटवून देणं जमू शकेल. उत्तम आरोग्यासाठी उत्तम पौष्टिक आहार हे सूत्र स्वीकारायला मात्र हवं,नाही का!