बुधवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू
NAGPUR : महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये कार्यरत प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. विहित मुदतीपूर्वी शहरातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरले जावेत यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.
TAPORI TURAKI नाही नाही…फुटबॉल गिळलाय तिनं.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे [ MAZI LADAKI BAHIN YOJANA – 2024 ] २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. स्वत: मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी विविध केंद्रांवर भेट देउन अर्ज स्वीकार करणारे कर्मचारी तसेच पात्र लाभार्थ्यांशी संवाद साधला आहे. शहरातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा व कुणीही योजनेपासून वंचित राहू नये. यादृष्टीने बुधवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
CINERANG LOKBIMB शर्टाला गाठ, १५ रिटेक आणि दोन भावांतील संघर्ष …