#medical chowk #nagpur #traffic jam
MEDICAL CHOWK NAGPUR : शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय (अर्थात मेडिकल) चौक हा नागपुरातील अतिशय महत्त्वाचा भाग़ याठिकाणी छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या लगतच्या राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. साहजिकच चौकात गर्दी असते़
शहराचा दक्षिण आणि पूर्व भागाला जोडणारा हा मेडिकल चौक़ या ठिकाणी सहा रस्ते एकत्र येतात़ त्यामुळे ‘ट्राफिक सिग्नल्स ’ नाहीत़ परिणामी वाहन चालकांच्या वाहतूक नियम न पाळण्याचे प्रमाण सर्वांत जास्त. दुचाकी, चारचाकी, सीटी बसेस, अँटो याशिवाय अन्य वाहनांची अमर्याद गर्दी़ …
भरीसभर ई-रिक्षा या सहाही रस्त्यांवर चौकात फुलपाखरांसारख्या भिरभिरत असतात. त्या सुद्धा ‘कट’ मारण्यात पटाईत झाल्या आहेत़ दुर्देव असं की या ई-रिक्षा चालवणाºयात तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक आहे. ही तपासणी केल्यास त्यांचे वय ७० वर्षांपर्यंत नक्कीच आढळून येईल.
काल शनिवारी दुपारी तसेच सायंकाळी पाऊस चांगलाच बरसला. अर्थातच चौकातील काही रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. सखल भाग तयार झाल्याने पावसाचे पाणी साचले जाते. मातीचा लवलेश नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा तर सोडाच! ते ड्रेनेज पाईपमध्ये सुद्धा शिरत नाही. त्यामुळे उन्हाळा- पावसाळा- हिवाळा अशा तिन्ही ऋतूत सायंकाळच्या सुमारास वाहतूक पार ‘जाम’ होत असते.
आपण चंद्रच काय सूर्यावरही पोहोचू़ वाहतुकीची समस्या कदापिही सोडविता येणार नाही़ नागपूर असो बिजापूर, कानपूर असो वा सोनपूर, ‘दुचाकीला चाकं दोनच’…
READ ALSO