MOHAN MATE BJP l October 25, 2024
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मोहन मते यांना भारतीय जनता पार्टीने [ BJP ] तिसºयांदा संधी दिली आहे़ आज शुक्रवारी त्यांनी आपला अर्ज सादर केला.
मोहन मते पहिल्यांदा १९९९ मध्ये भाजपाकडून पहिल्यांदा निवडून आले होते़ मागील २०१९ मध्ये पुन्हा एकदा संधी बहाल केली़ यावेळी तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती़. या निवडणुकीत मोहन मते यांनी फार कमी फरकाने अर्थात ४,०१३ मतांनी काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांना पराभूत केले होते.
मते यांनी ८४ हजार ३३९ , तर पांडव यांनी ८० हजार ३२६ मते मिळविली. या मतांमध्ये फक्त २.०८ टक्क्यांचा फरक होता. या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या मतांची संख्या ४,०१३ या फरकापेक्षा फक्त १ हजार ६६० ने जास्त होती, हे उल्लेखनिय!
यंदा काय …
यंदाची राज्यभरातील विधानसभा निवडणूक ही ‘प्रेस्टिज पार्इंट’ झालेली आहे. सत्ताधाºयांना कोणत्याही स्थितीत खुर्ची सोडायची नाही, तर विरोधकांना कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकारचे खाली खेचायचे आहे़