HOMEGUARD BHARATI : नागपूर शहर ग्रामीण होमगार्डमधील रिक्त असलेल्या पुरुष होमगार्ड 550 व महिला होमगार्ड 342 अशा एकूण 892 जागा भरण्यासाठी भरतीचे आयोजन 28 ते 30 ऑगस्टपर्यंत पोलिस मुख्यालय नागपूर (ग्रामीण) कामठी रोड येथे करण्यात आले होते. यात काही प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे.
ही भरती प्रक्रिया आता 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत पोलिस मुख्यालय, नागपूर (ग्रामीण) कामठी रोड येथे आयोजित करण्यात आली असून, उमेदवाराने ऑनलाईन अर्ज क्रमांकानुसार उपस्थित राहावे.
ऑनलाईन अर्ज क्रमांक1 ते 4000 पर्यंत महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवारांकरीता 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता, अर्ज क्र.4001 ते 8000 पर्यंत महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवाराकरीता 3 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता, 8001 ते 11828 चे पुढे दि. 4 सप्टेंबर रोजी महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवारांकरीता पहाटे 5 वाजता तर अर्ज क्रमांक 1 ते 11828 चे पुढे फक्त महिला उमेदवारांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5 वाजता पोलिस मुख्यालय, नागपूर (ग्रामीण) कामठी रोड येथे उपस्थित राहावे.
BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे
होमगार्डची एकूण 892 रिक्त जागेसाठी 23 ऑगस्टपर्यंत एकूण 11 हजार 828 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. होमगार्डपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट अशी आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज क्रमांकानुसार ज्या दिनांकास उपस्थित व्हायचे आहे, त्या दिनांकास ऑनलाईन अर्जाची प्रिंट, स्वतःचा पासपोर्ट फोटो, कागदपत्रे व त्याचे झेरॅाक्स प्रतिसह मैदानी चाचणीचे तयारीसह व दिलेल्या ठिकाणी व वेळेत उपस्थित व्हावे. गैरहजर असलेल्या उमेदवारांचा नंतर विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे कळविण्यात आले आहे.