KAUSHALYA VIKAS DINDI 2024 : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा [ MINISTER MANGALPRABHAT LODHA ] यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळांच्या साथीने विठूनामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.
पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.