उमेदवाराने एका पदासाठी एकदाच अर्ज सादर करणे अपेक्षित असून, विविध पदांसाठी अर्ज आल्यास दोन्ही ठिकाणी मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याबाबतची काळजी घेतली जाणार आहे.
POLICE RECRUITMENT NAGPUR : राज्यभरात आजपासून पोलिस भरती प्रारंभमहाराष्ट्र राज्य पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा १९ आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होत आहे. या अंतर्गत नागपूर शहर पोलिसात एकूण ३४७ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नागपूर शहर आयुक्तालयातील पोलिस शिपाई_भरती २०२२-२०२३ करिता एकूण ३४७ पदांकरिता एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले असून, यात पुरुष उमेदवारांचे २२ हजार २६९, महिला उमेदवारांचे ७ हजार ७९३ अर्ज आणि तृतीयपंथी उमेदवारांचे पाच अर्ज प्राप्त झाले आहेत.
याशिवाय नागपूर कारागृह शिपाई भरती २०२२-२०२३ साठी २५५ पदांकरिता एकूण ५५ हजार २९७ अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे ३९ हजार ६७४ अर्ज, महिला उमेदवारांचे १५ हजार ६१८ अर्ज आणि तृतीयपंथी उमेदवारांचे पाच अर्ज प्राप्त झाल्याचे आयुक्त रविंद्र सिंगल यांनी सांगितले.
राज्यस्तरावर १७ हजार पदे
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील १७ हजार ४७१ पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज , तर कारागृह विभागातील एक हजार ८०० पदांसाठी तीन लाख ७२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी माहिती दिली.
राज्यभरात १९ जूनपासून पोलिस भरतीला सुरुवात होत असून, १७ हजार ४७१ पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज पोलिस विभागाकडे प्राप्त झाले आहेत़ बँड्समन पदासाठी ४१ जागा उपलब्ध असून, ३२ हजार २६ जणांनी अर्ज केले आहेत. तुरुंग विभागातील शिपाई पदाच्या एका जागेमागे सुमारे २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी १ हजार ८००जागा उपलब्ध आहेत़ तर, तीन लाख ७२ हजार ३५४ अर्ज प्राप्त झालेत़ चालक पदासाठी १ हजार ६८६ जागा उपलब्ध असून, एक ९८ हजार ३०० अर्ज (एका जागेमागे ११७) आले आहेत. विशेष असे, की सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलिस शिपाई पदासाठी आहेत. ९ हजार ५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे गुणोत्तर आहे.
शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागांसाठी तीन लाख ५० हजार ५९२ अर्ज (एका जागेसाठी ८० उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित असून, शासकीय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या पार्श्वभूमीवर अर्ज आले असावेत, अशी माहिती पोलिस विभागाने दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस पडल्यास संबंधित उमेदवारांना पुढील तारीख दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
अग्निवीर सैन्य भरती : 27 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत
विदर्भातील युवकांसाठी अग्निवीर सैन्य [ AGNIVEER IN NAGPUR ] भरती मेळाव्याचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे 27 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.
प्रामुख्याने विदर्भातील युवकांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून उमेदवारांना सकस आहार व्यवस्था पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1, तिसरा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.