RAIN IN AMARAVATI l October 20, 2024
परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात धुमाकूळ घातला असून, अमरावती जिल्ह्यात [ RAIN IN AMARAVATI ] कालपासून झालेल्या पावसामुळे सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ तसेच, काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोºयाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील तळेगांव दशासर येथे जोराच्या वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली़ दोन तास कोसळलेल्या पावसात गाराही कोसळल्याची माहिती असून, गावाशेजारच्या नदीला पूर आला़
शनिवारी काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळला़ प्रकल्पाच्या 10 दरवाज्यातून 16 हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडारा जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कापून ठेवलेल्या धान पिकाचे नुकसान झाले आहे.
नागपुरातही शनिवारी पहाटे काही वेळ जोरदार पाऊस कोसळला.
नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद झाली. रविवारी सकाळी अप्पर मानार धारणाचे 5 तर विष्णुपुरी प्रकल्पाचा 1 दरवाजा उघडण्यात आला. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसाने सरासरी ओलांडल्याची माहिती आहे.
राजकीय पक्ष राजकारणात
सध्या राज्यातील सत्ताधाºयांसह सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे़ त्यामुळे शेतकºयांवर ओढवलेल्या या संकटांकडे लक्ष देण्यास शासन वा प्रशासनाजवळ वेळ नसल्याचे पाहावयास मिळत आहे़.
राजकारणाच्या बातम्या
भाजपाची पहिली यादी जाहीर, नागपुरातून फडणवीसांसोबत खोपडे, मते… बावनकुळेंनाही गवसली संधी
निकालाआधीच मतेंनी उधळला गुलाल, समर्थक म्हणतात दक्षिणेवर स्वारी आमचीच