RALEGAON VIDHANSABHA CONSTITUENCY l October 22, 2024
राळेगांव राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. अशोक उईके यांना आपल्या विधानसभा सदस्यत्वाची ‘हॅट्ट्रिक’ करण्याची संधी मिळेल का, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. आपण आपल्या राखीव मतदारसंघातील समस्या तसेच विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले नाहीत, असा दावा त्यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे़
भारतीय जनता पार्टीने मागील रविवारी जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रा. अशोक उईके यांचा समावेश आहे़ मागील दोन टर्म त्यांनी आमदार म्हणून गाजवल्या आहेत़ पहिल्यांदा २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल १ लाख ६१८ मते मिळविली होती. हे प्रमाण एकूण मतांच्या ५५.२६ टक्के होते. त्यांनी काँगे्रसचे उमेदवार प्रा. वसंतराव पुरके यांना पराभूत केले़ प्रा. पुरके यांनी ६१ हजार ८६८ मते मिळविली होती. (३३.९८ टक्के मते) अन्य उमेदवारांमध्ये सुरेश यशवंत मेश्राम, उत्तम रावजी मडावी, गुलाब जानबा पंधरे यांचा समावेश होता.
निकालाआधीच मतेंनी उधळला गुलाल, समर्थक म्हणतात दक्षिणेवर स्वारी आमचीच
TAPORI TURAKI चूहा निकलकर भागा और बिल में घुस गया…
निकालाआधीच मतेंनी उधळला गुलाल, समर्थक म्हणतात दक्षिणेवर स्वारी आमचीच
पुढील अर्थात २०१९ च्या निवडणुकीत प्रा. उईके यांचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसून येते़ यावेळी सुद्धा काँग्रेस उमेदवार प्रा. वसंतराव उईके यांच्यासोबत त्यांची लढत झाली. प्रा. उईके यांच्या मतांच्या प्रमाणात घट झाली, तर प्रा. पुरके यांच्या मतांत वाढ झाली. आमदार उईके यांनी एकूण ९० हजार ८२३ आणि प्रा. पुरके यांनी ८० हजार ९४८ मतांची प्राप्ती केली. अर्थातच मागील निवडणुकीच्या तुलनेत ‘नोटां’चे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून कोणत्या उमेदवाराला संधी मिळते, हे आजही जाहीर झालेले नाही.