एसटी स्टॅन्डवर पुण्याची कॉलेज तरुणी आपल्या तोºयात
तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते,
हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टर: बसा हो, कचरा भरल्यानंतर लगेच निघू या..
कंडक्टर नागपुरातील होता ना…
झंप्यानं आज लिहिलं अन् पोस्ट बी केलं…
माणूस मोठा झाला की बालपण विसरतो,
लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरतो,
मुल झाल्यावर भावंडाना विसरतो,
श्रीमंत झाल्यावर गरिबी, देवालाही विसरतो.
आणि म्हातारा झाला की सर्व काही मागे सारून
‘विसरलेल्यांना’ आठवतो…
दारूडा नाम्या दारू ढोसून मेला;
पण मरता मरता
डायलॉग मारून गेला़
दारू तो मैं ब्रँडेड पिता था,
पर साला ‘लिव्हर’ ही
खराब निकला..
आपली बायको माहेरी जाताना
शेजारच्या बायकांना सांगून जात असेल.
आणि त्याचा अर्थ
ताई जरा लक्ष ठेवा, असा येत असेल, तर
तर समजून जा, नवरा सीसी टीव्हीच्या निगराणीत आला आहे.
टक्कल खाजवत नामू दारूच्या दुकानाचे वास्तूशास्त्र
शोधत होता.
नाल्याजवळ असो…
दक्षिण दिशेला तोंड असो…
समोर खड्डा, झाड,
लाईटचा ट्रान्सफॉर्मर असो…
किंवा आणखी काही वास्तुदोष असो…
दुकानात गर्दी ओसंडून वाहत असते.