Textile Industry September 26, 2024
कृषिक्षेत्रानंतर रोजगार देणारे मोठे क्षेत्र वस्त्रोद्योग [ TEXTILE INDUSTRY ] आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात 6 कोटी लोकांना रोजगार देण्याचे नियोजन करणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
ते पत्रकारांसोबत बोलत होते.
सध्या अकोल्यात साडेतीन हजार हेक्टरवर मोठ्या प्रमाणावर रोपण करून प्रतिहेक्टर पंधराशे ते अठराशे किलो कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. पुढील वर्षी हे उत्पादन अकोल्यात 50 हजार हेक्टर्सवर घेण्याचे नियोजन असून, अकोल्याच्या कापूस शेतीचे प्रारूप संपूर्ण विदर्भात राबवण्याचा मानस मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला आहे.
मंत्र्यांना वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत [ CICR NAGPUR ] बियाणे कंपन्या, शास्त्रज्ञ, जिनिंग कंपनीचे मालक आदींची बैठक घेतली.
देशात कापसांचे उत्पादन पुढील वर्षी किमान एक हजार किलो प्रतिहेक्टरपर्यंत वाढावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री म्हणाले.