VIDHANSABHA ELECTION 2024 : राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

Spread the love

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.

file photo

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

MOHAN MATE विद्यमान आमदार मोहन मतेंनी दाखल केला नामांकन अर्ज

या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरूष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

EAST NAGPUR CONSTITUENY : कृष्णा खोपडे चौथ्यांदा सज्ज, सर्वसामान्यांना सहज भेटणारा आमदार अशी ओळख

Fri Nov 1 , 2024
Spread the loveKRUSHNA KHOPADE BJP l November 1, 2024 साधा माणूस आणि सहज उपलब्ध होणारा आमदार अशी खोपडे यांची ओळख आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा जोरदार धक्का देत त्यांनी विधानसभा गाठली होती. विधानभवनात प्रथमच पाय ठेवताच काँग्रेसचे नेते सतीश बाबूंचा पराभव करणारे खोपडे यांना […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links