VOTERS LISTS l October 17, 2024
कुणा मतदाराचे मतदारयादीत [ VOTERS LISTS ] नाव नसल्यास निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा संधी प्रदान केली असून, संबंधितांना १९ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे़ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी या संदर्भात माहिती दिली.
CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून अभिनय
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ [ VIDHASABHA ELECTION 2024 ] चा कार्यक्रम जाहीर झाला असून, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
कुणी मतदार यादीतील समाविष्टापासून दूर असल्यास १९ आॅक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. आपले नाव आवर्जून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी.
TAPORI TURAKI पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…
ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही, त्यांनी तातडीने १९ आॅक्टोबरपर्यंत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे़ त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येणार आहे. अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना १९ आॅक्टोबर रोजी रात्रीपर्यंत आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध केलेली असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरू आहे.