‘लोकबिंब’ ने वर्तवली होती शक्यता
SUDHAKAR KOHALE l October 28, 2024
भारतीय जनता पार्टीने नागपुरातील पश्चिम नागपूर, मध्य नागपूर आणि उत्तर नागपूर या तीन मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले असून, ‘पश्चिम नागपूर’ [ WEST NAGPUR VIDHANSABHA CONSTITUENCY ] साठी ‘दक्षिण नागपूर’चे माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे [ SUDHAKAR KOHALE ] यांना मोठी संधी दिली आहे. साप्ताहिक ‘लोकबिंब’ [ WEEKLY LOKBIMB ] यासंदर्भात शक्यता वर्तवली होती़
भारतीय जनता पार्टीने नामांकन दाखल करण्याला काही तासांचा कालावधी उरला असतानाही पश्चिम नागपूर, मध्य नागपूर आणि उत्तर नागपूर या तीन मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले नव्हते़ त्यामुळे संभाव्य उमेदवारांची घालमेल सुरू होती़ अशातच आज सोमवारी पश्चिम नागपूरसाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना संधी मिळाली आहे़
पक्ष नेतृत्वाने उत्तर नागपूर (अनुसूचित जाती राखीव) साठी मिलिंद माने आणि मध्य नागपूर मतदारसंघासाठी विद्यमान विधानपरिषद सदस्य तसेच माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे़
‘दक्षिणे’तील स्वारी
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर देशमुख, प्रगती पाटील यांच्यासह सुधाकर कोहळे यांच्या नावाची चर्चा होती़ दक्षिण नागपूरचे माजी आमदार असतानाही त्यांना मागील निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती, तर यंदा विद्यमान आमदार मोहन मते यांना कायम ठेवण्यात आले़
अन्य राजकीय बातम्या
WEST NAGPUR VIDHANSABHA पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे?
सुधाकर कोहळे म्हणतात, मी मागील दाराने नाहीच…आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक
कोहळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता़ पाच वर्षांनंतर मागील निवडणुकीत [ 2019 ] मोहन मते यांचा विचार करण्यात आला़ मात्र, मते यांना अतिशय निसटता विजय स्वीकारावा लागला होता.
यंदा पुन्हा एकदा सुधाकर कोहळे यांना दक्षिण नागपूर येथून संधी मिळणार असल्याची सुरू झाली होती; परंतु पहिल्याच यादीत मोहन मते यांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे कोहळे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याची बाब समोर आली होती.
प्रत्यक्ष निवडणूक काळात अशी नाराजी पाहता कोहळेंना शहरातच अन्य का होईना [ पश्चिम नागपूर ] संधी मिळणार असल्याची दाट शक्यता ‘लोकबिंब’ ने वर्तवली होती.