YOU MUST STOP ONE SECOND : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘यू मस्ट स्टॉप वन सेकंड’ या रस्ते अपघातविरोधी जनजागृती मोहिमेतील टी-शर्टचे अनावरण नववर्षाच्या पूर्वसंध्याला करण्यात आले.
संपूर्ण देशभरात रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय मुंदलकर यांच्या वतीने ‘यू मस्ट स्टॉप वन सेकंड…’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यातील सहभागी सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या टी-शर्टस्चे अनावरण नववर्षाच्या पूर्वसंध्याला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या सपना सागुळले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सदर मोहिमेची संक्षिप्त माहिती दिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सपना सागुळले, सुबोध मशानकर, अतुल सागुळले, संजय मुंदलकर उपस्थित होते.
‘यू मस्ट स्टॉप वन सेकंड…’ या मोहिमेत श्रावली लाकडे, वंशिका जुमडे, इंद्र्रजित मशानकर, अवनी मुंदलकर, रिद्धिमा जुनघरे, जाई सागुळले, रुद्रानी डहाके ही विद्यार्थी मंडळी मोहिमेतील सदस्य आहेत.
दरम्यान, ‘यू मस्ट स्टॉप वन सेकंड…’ यांच्या वतीने नागपुरातील चौकांमध्ये फलकांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे TRAFFIC RULES पालन करण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे
तसेच, परिसरातील अपघातांचे स्थान ठरलेल्या चौकात आणि रस्ते परिसरात वाहनचालक तसेच लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
याशिवाय नागरी आणि ग्रामीण भागात पाँम्प्लेट वितरीत करून लोकांमध्ये वाहतूक नियमांची देण्यावर भर देण्यात येईल. मालवाहतूक करणाºया लहान वाहनधारकांना लाल झेंड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे संजय मुंदलकर यांनी ‘लोकबिंब’ ला सांगितले.