मतदारांमध्ये दिसतोय निरुत्साह
LOKSABHA ELECTION VOTING IN MUMBAI : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.धुळे- २८.७३ टक्के, दिंडोरी- ३३.२५ टक्के, नाशिक – २८.५१ टक्के,पालघर- ३१.०६ टक्के, भिवंडी- २७.३४ टक्के, कल्याण – २२.५२ टक्के, ठाणे – २६.०५ टक्के, मुंबई उत्तर – २६.७८ टक्के, मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के, मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के, मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के तर मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण – मध्य मतदारसंघात २७.२१टक्के आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात केवळ २४.४६ टक्के मतदान पार पडले.
चौथा टप्पा असा होता …
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (१३ मे) ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले होते. यात खालील मतदारसंघांचा समावेश होता़
नंदुरबार – ३७.३३ टक्के ,जळगाव- ३१.७० टक्के ,रावेर – ३२.०२ टक्के ,जालना – ३४.४२टक्के ,औरंगाबाद – ३२.३७ टक्के ,मावळ -२७.१४ टक्के , पुणे – २६.४८ टक्के , शिरूर- २६.६२ टक्के, अहमदनगर- २९.४५ टक्के , शिर्डी -३०.४९ टक्के , आणि बीड – ३३.६५ टक्के.