झाले तेच, संजय निरुपम शिवसेना (शिंदे गटात) पक्षात दाखल

Spread the love

#sanjay nirupam # rajsatta

SANJAY NIRUPAM : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम यांनी शुक्रवारी शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. दोन दिवसांआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती.

काही कारणांमुळे 2004-05 मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता़ मात्र, काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचारांवर काम करण्याची अडचण येत होती़ ती अडचण आता आमच्यासमोर नाही़ शिवसेनेत प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे. वीस वर्षांनंतर स्वगृही परतत आहे. मी एकटाच नाही तर कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे निरुपम यांनी सांगितले़ हा सौभाग्याचा दिवस असून, आपल्या अंगी बाळासाहेबांचे विचार भिनलेले आहेत, असे त्यांनी नमूद केले़

दरम्यान, ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते़ पक्षाविरोधात भाष्य केल्याने त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. निरुपम यांनी काँग्रेसच्या ‘इंडिया’आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल आणि गटाचे नेते उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती़

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राहुल गांधींची मोठी घोषणा: शेतकरी कर्जमुक्ती आयोग स्थापन करणार, गरीब महिलेस देणार एक लाख

Fri May 3 , 2024
Spread the love #rahul gandhi # pune RAHUL GANDHI IN PUNE : आमची सत्ता आल्यांनंतर देशातील अग्निवीर योजना बंद करणार असून, जीएसटी सुद्धा हटवण्यात येईल़ २२ लोकांना वाटलेला पैसा सर्व शेतकरीबांधवांत वाटणार आहोत. सगळ्या दलित, आदिवासी, मागासांना आरक्षण देणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली़ पुणे येथे […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links