SAUMYA SHARMA IAS : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सौम्या शर्मा यांनी गुरुवार ( 5 SEPTEMBER ) रोजी स्वीकारली. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त पदभार) आंचल गोयल यांनी श्रीमती शर्मा यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
तत्पूर्वी त्यांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती शर्मा यांनी देखील नागपूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि आंचल गोयल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
LOKBIMB PHOTO STUDIO पोलिस पाटील संघाचे आठवे राज्यस्तरीय अधिवेशन …
भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१८ या वर्षीच्या बॅचच्या अधिकारी सौम्या शर्मा यांनी नागपूर स्मार्ट सिटीपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे. त्यांनी नांदेड येथे जिल्हा प्रशासनामध्ये सुद्धा काम केले आहे.
सौम्या शर्मा यांनी नागपूर जिल्हा परिषद येथे मोठ्या संख्येत पदभरती केली होती. त्यांनी नागपूर जिल्हा परिषद येथे शिक्षण , महिला व बाल कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गुरुवारी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत आणि स्मार्ट सिटीचा विविध कामाबद्दल माहिती प्राप्त करून घेतली.
LOKBIMB MANJIREE सनदी अधिकारी दीपा मुधोळ मुंडे ‘स्कॉच’ पुरस्काराच्या मानकरी