विद्यमान खासदार नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून आपल्या विकासकामांच्या जोरावर बहुमताने विजयी होतील, असा दावा भारतीय जनता पार्टीने वेळो वेळी केला होता.
HATTRICK GADKARI : अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या नागपूर मतदारसंघातील उमेदवार विद्यमान खासदार तसेच केंद्रीय मंत्री अर्थातच विकास मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी आज आपल्या विजयाची ‘हॅट्ट्रिक ’ साधली आहे़
यंदा निवडणुकीत त्यांनी एकूण ६ लाख ५५ हजार २७ मतांची प्राप्ती केली असून, आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना १ लाख ३७ हजार ६०३ मतांनी मात दिली आहे.
विद्यमान खासदार नितीन गडकरी [ NITIN GADKARI ] तत्कालीन महाराष्ट्र सरकारमध्ये बांधकाम मंत्री म्हणून सक्रिय असताना राज्यातील रस्ते, ुपुलांच्या निर्मितीचा धडाका लावला होता़ यानंतर सन २०१४ आणि २०१९ मध्ये केंद्र सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री असताना देशभरात महामार्ग, दुर्गम भागात बोगद्याचे रस्ते आणि पुलांची निर्मिती केल्याने यांच्या कामांचे विरोधी पक्षाकडून अनेक वेळा कौतुक झाले आहे. हाच मुद्दा हेरून नागपूरकरांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांची निवड बिनविरोध करण्याची मागणी केली होती.
सामाजिक संस्था एकत्र
नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार म्हणून बिनविरोध नियुक्ती करण्याची मागणी समोर आणली. नागपुरातच नाही तर देशातही नितीन गडकरी सातत्याने लोकाभिमुख कामे करत आहेत. यामुळे त्यांना बिनविरोध लोकसभेत खासदार म्हणून पाठवा, अशी मागणी करणारे फलक नागपूर शहरात दिसून आले होते.
याशिवाय विरोधी पक्षातील नेतेमंडळी नितीन गडकरींच्या कामांचे कौतुक करत असल्याने त्यांनीही उमेदवार उभा न करता बिनविरोध निवडून द्यावे, असे म्हणणे विरोधी पक्षातील नेत्यांना भेटून समजावून सांगण्याचा विचारही पुढे आला होता़
READ ALSO
जीजा जी, क्या आप जर्मन भाषा पढ़सकते हो ? TAPORI TURAKI
उद्धव ठाकरेंची आॅफर
भारतीय जनता पक्षाकडून जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतून नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती़ त्यामुळे देशभरात शंका-कुशंका निर्माण होण्यास आणि अफवा पसरण्यास वेळ लागला नाही. अशातच शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली आॅफर दिली होती. महाविकास आघाडीत आल्यास आम्ही तुम्हाला निवडून आणू, असे त्यांनी म्हटले होते. यावर नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांची आॅफर फेटाळत असे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे म्हटले होते. भाजपात उमेदवारी देण्याची एक पद्धत आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीची चिंता करू नये, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले होते.
नंतरच्या दिवसांत पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली़़़ धडाक्यात प्रचार झाला… निकाल आता सर्वश्रृत आहे. आणि आता त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची सुद्धा ‘हॅट्ट्रिक’ करावी, अशी अपेक्षा देशवासी व्यक्त करत आहेत.
एक्झिट पोलमध्येही वरचढ
१८व्या लोकसभा निवडणुकीती मतदानाची सांगता १जून रोजी झाली. या दिवशी देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जून रोजी निकालाकडे लागले होते़ अशातच १ जून रोजीचे मतदान संपते न संपते तोच ‘एक्झिट पोल’चे आकडे समोर आले़ वृत्तवाहिन्यांनीच निकाल जाहीर केला की काय, अशी परिस्थिती त्या दिवशी अनुभवास आली़. अशातच महाराष्ट्रात भाजपा हा राज्यात सर्वांत मोठा पक्ष असल्याचे ‘एबीपी सी व्होटर’ने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटले होते.