१८ लाख ३६ हजार ७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Spread the love

अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत.

जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले.

अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तांत्रिक बाबा, किसी सुंदर लड़की का हाथ पाने...TAPORI TURAKI

Fri Apr 26 , 2024
Spread the love मालिक (नौकर से): मैं बाजार जा रहा हूं़ तुम दुकान का ध्यानरखना. अगर कोई आॅर्डर दे तो उसे अच्छे से पूरा करना़कुछ देर के बाद मालिक आया…मालिक : कोई आॅर्डर आया?नौकर : जी हां, आया था, उसने आॅर्डर दिया कि दोनों हाथ ऊपरकरके कोने में खड़े हो […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links