हाऊस कीपर पांडे ताई : मॅडम, मला १० दिवसांची सुट्टी पाहिजे.
मॅडम जोशी : अगं, अशी कशी तुला इतक्या दिवसांची रजा देऊ?
हाऊस कीपर पांडे ताई : का बरं, सुटीसारखी सुट्टी द्या.
मॅडम जोशी : अगं तसं नाही़ साहेबाचं जेवण कोण बनवेल? त्यांचे कपडे कोण धुणार? त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल?
पांडे ताई : तुम्ही म्हणत असाल, तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का?
देशपांडे काकू : भय्या दूध में इतनी मिलावट करते हो.भगवान से कुछ तो डरो.
दूधवाला : मिलावट की बात आप तो करो ही मत बहनजी़
देशपांडे काकू : क्यों ?
दूधवाला :अपनी फेसबूकवाली डीपी देखो और अभी अपनी शक्ल आईने में देखो… शुक्र मनाओ, हमने कमेंट नहीं किये हैं उसपर! लाओ चुपचाप भगौना दो…
बायको नूतन म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होता, तसं उद्या एक दिवस ट्रीट कराना प्लीज…
मी म्हणालो, ठीक आहे.
दुसºया दिवशी दुपारी १२ च्या मुव्हीला गेलो़. रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. बाईकवरून भरपूर फिरलो़ खूप खूप गप्पा मारल्या,रस्त्यात आईस्क्रीम खाल्ल आणि…
परत येताना तिला तिच्या घरी सोडून स्वत:च्या घरी आलो.
.
.
.
तेव्हापासून सासरे फोनवर फोन करताहेत.
बायको : कुठं आहात ? डिनरला जायचं आहे ना! उशिर होतोय.
नवरा : मी माझ्या टीमसोबत एक महत्त्वाचा प्रयोग करण्यात व्यस्त आहे.
बायको : प्रयोग, कसला प्रयोग आणि इतक्या रात्री?
नवरा : आम्ही एका विशिष्ट थंड तापमानात C2H50h गरम (व्हिस्की) मध्ये H2O पाणी व तरल पदार्थ C2O (सोडा) यांचे मिश्रण केले आहे.
मिश्रणाचे तापमान अजून शून्य अंशात आणण्यासाठी त्यात H2O (बर्फ) चे गोल तुकडे काही मात्रेत टाकले आहेत.
आता आम्ही काहीतरी protein (चणे, शेंगदाणे, काजू, तंदुरी) तत्वांची वाट बघत प्रयोगशाळेचे वातावरण एका विशिष्ट वाफेने (सिगारेट) सुगंधित करत आहोत.
आणि हो या प्रयोगाला कमीत कमी ३ ते ४ तास लागतील आणि मी प्रयोगाचा हेड आहे़ त्यामुळे अधिक उशीर होऊ शकतो, तेव्हा चिल्यापिल्यासह जेवून घे.
बायको : बरं बरं … डिस्टर्ब केलं मी तुम्हाला. तुम्ही कामावर लक्ष ठेवा़ मी खिचडी बनवेन. तुम्ही पण काहीतरी मागवून खाऊन घ्या…