LOKBIMB EDITORIAL मोबाईलवर चांगल्या-वाईट गोष्टी सर्व काही उपलब्ध

Spread the love

अगदी साधारण व्यक्तीही स्मार्टफोन खरेदी करीत असून इंटरनेटही हाताळत आहेत़ सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात सरासरीने तीन मोबाईल फोन आढळून आले आहे. भरीसभर आपल्या ग्राहकांना कमी पैशांत आणि मोठ्या कालावधीसाठी इंटरनेट डाटा देण्याची खासगी कंपन्यांत जणू शर्यत लागल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पोर्नसारखा प्रकार सहजच घरात पोहोचला, ज्यातून लैंगिक अत्याचारांच्या घटनांना प्रोत्साहन मिळत आहे़

file photo

सध्याच्या माहिती संचार तंत्रज्ञानातील मोठे उपकरण मानवाच्या हाती लागले, ते म्हणजे मोबाईल. केवळ संपर्कासाठी असलेल्या या उपकरणाने जगाला जवळ तर आणले; परंतु त्याच्या मदतीला आलेल्या इंटरनेटने मात्र मानवाला परस्परांपासून तेवढ्याच वेगाने दूर केले. अनेक समस्यांसोबतच अश्लीलताही घराघरात पोहोचली. कारण इंटरनेटच्या मदतीने मोबाईलवर चांगल्या-वाईट गोष्टी सर्व काही उपलब्ध आहे. यात पोर्नचाही समावेश आहे.
असे सांगण्यात येते की पॉर्न पाहणाºयांच्या यादीत अमेरिका, कॅ नडा, इंग्लंडनंतर भारतही समाविष्ट आहे.

मध्यंतरी भारत सरकारने पॉर्न साईट्सवर बंदी आणण्यासाठी पावले उचलली होती. मात्र, या निर्णयामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
स्वस्त वा सहजरित्या मिळणाºया कर्ज योजनांमुळे स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे पॉर्न पाहणाºयांची संख्या वाढत असल्याचे उघड झाले आहे़ भारतात पॉर्न पाहणाºयांची संख्या दुपटीने वाढली आहे. या संदर्भात भारतात पॉर्न पाहण्याची सरासरी वेळ आठ मिनिटांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येते. देशातील निमशहरांमध्ये पोर्नोग्राफ सर्च करण्याचे आणि पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे मोबाईलवर पॉर्न पाहणे सुरक्षित नसल्याचे एका अहवालामधून समोर आले होते़ या माध्यमातून हॅकर्स युझर्सकडून डेबिट, क्रेडिट कार्डची माहितीही चोरू शकतात.


इंटरनेटवर जेवढा मजकूर (कंटेट) उपलब्ध आहे, त्यापैकी मोठा हिस्सा हा पॉर्न श्रेणीत येत असल्याचेही सांगण्यात येते. स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे ही आकडेवारी वाढतच चालली आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत मोबाईल निर्मात्या कंपन्यांना भारतासारखी मोठी आणि भरवशाची बाजारपेठ गवसली आहे़ भारतात मोबाईल वापरणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ शिवाय दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.


अगदी साधारण व्यक्तीही स्मार्टफोन खरेदी करीत असून इंटरनेटही हाताळत आहेत़ सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात सरासरीने तीन मोबाईल फोन आढळून आले आहे. भरीसभर आपल्या ग्राहकांना कमी पैशांत आणि मोठ्या कालावधीसाठी इंटरनेट डाटा देण्याची खासगी कंपन्यांत जणू शर्यत लागल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पोर्नसारखा प्रकार सहजच घरात पोहोचला, ज्यातून लैंगिक अत्याचारांच्या घटनांना प्रोत्साहन मिळत आहे़


पोर्न पाहणाºयांची श्रेणी आणि कारणे वेगवेगळी असल्याचेही आढळून आले आहे. लैंगिकता तसेच इतर गोष्टींविषयीची माहिती करून घेण्यासाठी काही लोक पॉर्न पाहणे पसंत करतात. ही आकडेवारी मात्र अल्प आहे. समाधानकारक लैंगिक सुख न मिळाल्यामुळेही लोक याकडे वळत असल्याचे समोर आले आहे. कंटाळा, थकवा दूर व्हावा म्हणून चार टक्के लोकांना पॉर्न पाहणे आवडत असल्याचे समोर आले आहे.

हा मानसिक आजार
भावनिक दडपण आल्यामुळे आणि तणाव कमी होण्यासाठी सुद्धा काहीजण पॉर्नकडे वळतात. याशिवाय लैंगिक सुख, लैंगिकतेविषयी असलेली जिज्ञासा आणि काल्पनिक जगामध्ये रमण्यासाठी सुद्धा लोकांना पॉर्न पाहणे जास्त प्रमाणात आवडते, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. काहींनी पॉर्न पाहणे हा मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे़ तर, काहींनी ते सवयीमुळे होणारे असे संबोधले आहे. पॉर्न पाहण्याच्या सवयीमागे खासगी आयुष्यातील अडचणी, एकाकीपणा अशा गोष्टी कारणीभूत असल्याचे मत मानसशास्त्रज्ञ नोंदवतात. पॉर्न पाहणे कधी धोकादायक ठरते, याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण ते व्यक्तिपरत्वे ठरते, असे देखील मत शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.

RIGHTS RESERVED

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महाराष्ट्रात आठ जागांसाठी मतदार सुरू, कुठे उत्साह तर कुठे मतदानावर बहिष्कार

Fri Apr 26 , 2024
Spread the loveआज मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असून, सकाळी ९ वाजेपर्यंत नांदेड येथे ७.२३ टक्के, परभणी ९.७२ टक्के, वर्धा ७.१८ टक्के, यवतमाळ-वाशिम ७.२३ टक्के, अकोला ७.१७ टक्के, अमरावती ७.३४ टक्के, बुलढाणा ६.६१ टक्के, हिंगोली ७.२३ टक्के इतके मतदान झाले़ दुसरीकडे विवाहसोहळ्याचाही मुहूर्त असल्यामुळे काही मतदारांना थोडी कसरत करावी लागत […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links