महाराष्ट्रात आठ जागांसाठी मतदार सुरू, कुठे उत्साह तर कुठे मतदानावर बहिष्कार

Spread the love

आज मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असून, सकाळी ९ वाजेपर्यंत नांदेड येथे ७.२३ टक्के, परभणी ९.७२ टक्के, वर्धा ७.१८ टक्के, यवतमाळ-वाशिम ७.२३ टक्के, अकोला ७.१७ टक्के, अमरावती ७.३४ टक्के, बुलढाणा ६.६१ टक्के, हिंगोली ७.२३ टक्के इतके मतदान झाले़ दुसरीकडे विवाहसोहळ्याचाही मुहूर्त असल्यामुळे काही मतदारांना थोडी कसरत करावी लागत आहे़अनेक ठिकाणी मात्र नवरदेव महाशयांनी आधी ‘मतदान हक्का’चे लगीन लावून नंतर आपल्या डोक्यावर अक्षता पाडून घेत

LOKSABHA ELECTION SECOND PHASE IN MAHARASHTRA : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या दुसºया टप्प्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन अशा एकूण आठ मतदारसंघातील निवडणुकीतील मतदान आज करण्यात येत आहे. यात यवतमाळ-वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, बुलडाणा, हिंगोली, नांदेड,परभणी अशा विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन, एकूण आठ जागांसाठी मतदान सकाळी सातवाजतापासून सुरू झाले. दरम्यान, २६ एप्रिल रोजी देशभरातील दुसºया टप्प्यात ८८ जागांसाठी मतदान होत आहे़

दिघी क्रमांक दोन येथील सरपंच शीतल मडावी, सदस्य ज्योत्स्रा विलास वाघाडे, सुरेश पुनसे, लक्ष्मण शेंद्रे, राजानंद बन्सोड, देवानंद मडावी तसेच अन्य़

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (शिवसेना-शिंदे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय देशमुख यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे़ दोन्ही नेते मूळत: शिवसेनाचे कार्यकर्ते आहेत़ शिवसेना-शिंदे गटाने विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर राजश्री पाटील यांना संधी देण्यात आली; परंतु त्या बाहेरील असल्याचा ठपका वारंवार ठेवण्यात आल्याचे दिसून आले़

यवतमाळ येथील डॉ. आप्पासाहेब वानखडे, सौ़ शीतलताई वानखडे यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

अकोला मतदारसंघात काँगे्रसचे डॉ. अभय पाटील, भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे आहेत़ वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार अमर काळे यांच्यात थेट सामना असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे़ या मतदारसंघात सुद्धा शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडल्या़ तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ तळेगांव येथे सभा घेतली होती़ या सर्वांचा फायदा कुणाला होणार, याबाबत ४ जून २०२४ रोजी कळणार आहे़

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर चिन्ह दर्शवताना यवतमाळ येथील मनोहर भेंडारकर, सौ़ नंदाताई भेंडारकर

बुलडाणा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रताप जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नरेंद्र खेडेकर, अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात मुख्य लढत असल्याचे पाहावयास मिळते़ सदरचे तुल्यबळ उमेदवार असल्याचे येत्या ४ जून रोजी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ अमरावती मतदारसंघात मुख्य लढत काँग्रेसचे बळवंत वानखेडे, प्रहार पक्षाचे प्रशांत बुब आणि नव्याने भाजपात दाखल झालेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात जोरदार लढतीची शक्यता आहे़ काँग्रेस खासदार राहुल गांधी तसेच भाजपा नेते अमित शहा यांच्या प्रचारसभांनी येथे रंगत आली होती़ या मतदारसंघात विद्यमान खासदाराला आपली जागा कायम ठेवण्यासाठी मोठी टक्कर द्यावी लागणार आहे़

यवतमाळ येथील ८५ वर्षीय कमलाकर माळवी यांनी आपला राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली़

याशिवाय मराठवाड्यातील अन्य तीन जागांवरही मतदान होणार आह़े यात हिंगोली मतदारसंघात महायुतीकडून (शिवसेना-शिंदे गट) बाबूराव कदम कोहळीकर, महाविकास आघाडीचे उमेदवार (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नागेश पाटील आष्टीकर यांच्यात मुख्य लढत असल्याचे पाहावयास मिळते़ नांदेड मतदारसंघात भाजपाचे प्रतापराव चिखलीकर आणि काँगे्रसचे वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत होत आहे़ तर, परभणी जागेवर रासपचे महादेव जानकर (महायुतीचे समर्थन) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे़

सर्वांत जास्त उमेदवार
बुलढाणा -०५ लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात आहे़ शिवाय यात १०अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे़ अकोला -०६ लोकसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात असून, सहा अपक्ष आहेत़ अमरावती-०७ लोकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त म्हणजे ३७ उमेदवार आपले नशीब अजमावत असून, यात २४ अपक्ष उमेदवार आहेत़ वर्धा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे़ यापैकी पाच अपक्ष उमेदवार आहेत.

यवतमाळ येथीलविद्या माळवी यांनी मैत्रिणीसह जि़प़ शाळेत मतदानाचा हक्क बजावला़

यवतमाळ-वाशिम (१४) मतदारसंघात एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ तर,१० अपक्ष उमेदवार आहेत़ हिंगोली -१५ लोकसभा मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आहे़ यात एका तृतीयपंथियासह १९ अपक्ष उमेदवार आहेत़ नांदेड-१६ मतदारसंघात एकूण २३ उमेदवार आपले नशिब अजमावत असून, यापैकी १३ अपक्ष आहेत़ परभणी-१७ मतदारसंघात एकूण ३४ उमेदवार आहेत़ तर,२१ अपक्ष उमेदवार आहेत़

दरम्यान, मागील १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील पहिला टप्पा संपला़ नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये अनुक्रमे ५४.६४ टक्के, ५९.५८ टक्के, ६४.७२ टक्के,७०.३८ टक्के आणि ६३.०७ टक्के (सायंकाळी सहापर्यंतची आकडेवारी) मतदान झाले.

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

Sat Apr 27 , 2024
Spread the love JEE SUCCESS : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links